सोमनाथचा धबधबा 

मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतात. येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा , आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे. मूल शहरापासून नऊ किलोमीटरवर अंतरावर सोमनाथ आहे . येथे निसर्गरम्य वातावरण , वाहता धबधबा प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. हिरव्याकंच वनराईत निखळपणे वाहनाऱ्या या धबधब्यामुळे मनाचे स्वप्नपूर्ण होत असून धरणशेजारील नैसर्गिक दगडी ओट्यांवर बसून अनेक तरुण – तरुणी बेभान होऊन नाचतांना दिसतात. येथे ज्येष्ठ नागरिकही परिवारासह वनभोजनाचा आनंद घेतात. धबधब्यात पवित्र लाटांच्या सरीवर – सरी जेव्हा अंगावर कोसळतात तेव्हा प्रत्येकजण स्वत : चे भान हरवून जातो. हा आनंद घेण्याचा दुर्मिळ योग सध्या सोमनाथमध्ये अनुभवता येत आहेत . या पर्यटनस्थळी मूल परिसरातीच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक सध्या मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून परिसरातील व्यावसायिकही सुखावले आहे.