अनधिकृत पँथालाँजी तंञज्ञ खेळतात जनतेच्या आरोग्याशी खेळ

0
224

मूल (प्रतिनिधी)
अधिकृत पदवी, पदविका आणि महाराष्ट्र परावैद्यक परिषदेत नोंदणी नसताना अनेकजन जिल्ह्यात अनधिकृत लेबोरेटरी व पँथालाँजी थाटुन जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
व्यक्तीच्या आरोग्यावर योग्य निदान करता यावे म्हणुन रक्त, थुंकी, लघवीचे नमुने तपासण्याची पध्दत अलीकडे चांगलीच प्रचलित झाली आहे. ह्याचाच फायदा घेवुन अनेकजण प्रयोगशाळा तंञज्ञ असल्याचे सांगुन जिल्ह्याच्या विविध भागात क्लिनिकल लेबोरेटरी, पँथालाँजी थाटुन पैसे लुबाळण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. मान्यताप्राप्त लेबोरेटरी टेक्नोलाँजी अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदवीका नसताना आणि महाराष्ट्र परावैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपञ नसताना चंद्रपूरातील एका पँथालाँजी संचालकाने मूल येथील एका रूग्णांचे रक्त नमुणे तपासण्यासाठी घेतले. तपासणी अंती त्या पँथालाँजी संचालकाने त्या रूग्णाच्या रक्तामध्ये दोष असल्याचा अहवाल देतांना रक्तगटही बदलवुन टाकला. सदर पँथालाँजी संचालकाने दिलेल्या अहवालावर रूग्णाच्या मुलाचा विश्वास बसला नाही. त्या अहवालावर शंका आल्याने खाञी करून घेण्यासाठी म्हणुन रूग्णाच्या मुलाने पालकास चंद्रपुरातीलचं दुसऱ्या एका परीचीत लेबोरेटरी मध्ये घेवुन गेला. पहील्या तपासणीचा अहवाल न दाखवता रक्ताचा नमुना तपासणीकरीता दिला. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या रक्त नमुन्याचा अहवाल जेव्हा हाती आला तेव्हा त्या पालकाच्या मुलाला धक्का बसला. पहिल्या पँथालाँजी संचालकाने दिलेला रक्त गट दुसऱ्या अहवालात बदललेला आणि रक्त चाचणीतही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास आले. रूग्णाच्या मुलाने दुसऱ्या पँथालाँजी तंञज्ञाला पहील्या पँथालाँजी तंञज्ञाने दिलेला अहवाल दाखविला तेव्हा अनधिकृततेचा पुरावा उजेडात आला. याबाबत रूग्णाच्या मुलाने पहील्या पँथालाँजी तंञज्ञाला विचारले तेव्हा चुक मान्य करीत आर्थिक देवाणीतुन प्रकरण शांत करण्यात आले. वास्तविक प्रयोगशाळा तंञज्ञ म्हणुन काम करणाऱ्या व्यक्ती कडे मान्यताप्राप्त मेडीकल लेबोरेटरी टेक्नोलाँजी अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदवीका असणे अनिवार्य असुन मुंबई स्थित महाराष्ट्र परावैद्यक परिषदेत त्या व्यक्तीच्या नांवाची नोंद असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांना माणसाचे रक्त, थुंकी, लघवी आदी नमुने तपासण्याचा कायदेशीर अधिकार नसतो. असे असतांना अनेकजन जिल्ह्याच्या विविध भागात पँथालाँजी थाटुन तर काहीजन रक्त नमुने संकलन करणारे तंञज्ञ म्हणुन घरोघरी जावुन रक्त नमुने घेवुन त्यापोटी शुल्काच्या नांवाखाली अवाजवी रक्कमा स्विकारून व्यक्तीच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसुन आले. महाराष्ट्र परावैद्यक अधिनियम २०११ मधील कलम ३१ पोट कलम (१) मध्ये नमुद केल्याप्रमाणे जो व्यक्ती आवश्यक प्रमाणपञाच्या आधारे नांवाची नोंद करेल त्याच व्यक्तीला वैद्यकीय प्रयोगशाळा तंञज्ञ म्हणुन नोंदणी क्रमांक व प्रमाणपञ देते. त्याच व्यक्तीला अधिकृतरित्या पँथालाँजीचे संचलन करता येते. परंतु राज्यातील काही कार्पोरेट पँथालाँजी लेबोरेटरी व एम.डी.पँथालाँजी डाँक्टर अप्रशिक्षित व महाराष्ट्र परावैद्यक परीषदेत नोंद नसलेल्या व्यक्तीना कमीशन देवुन तोतयेगिरीला चालना देत असल्याने रूग्णांना आर्थिक नुकसान व चुकीच्या उपचारांना बळी पडाव लागत असल्याचे दिसुन येत आहे. अश्या तोतया पँथालाँजी तंञज्ञावर कायद्यानुसार अपराध व शास्तीमधील कलम ३१ अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती महाराष्ट्र परावैद्यक परीषदेने केली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाची संधी साधुन प्रयोगशाळा तंञज्ञ असल्याची बतावणी करून रूग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेत आर्थिक लुट करणाऱ्या अनधिकृत पँथालाँजी तंञज्ञावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा अनेक निष्पाप जीवांना जीव गमवावा लागेल. अशी भिती वाटु लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here