जखमी वाघाच्या हल्ल्यात पशु वैद्यकीय अधिकारी डाँ. रविकांत खोब्रागडे जखमी

0
220

मूल (प्रतिनिधी)
जखमी वाघाला बेशुध्द करून उपचार करण्यासाठी गेलेल्या पशु वैद्यकिय अधिकारी डाॅ.रविकांत खोब्रागडे याचेवर वाघाने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील डोणी येथे घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र मूल क्षेत्रातील डोणी गांवालगतच्या जंगलातषचार पाच दिवसांपुर्वी दोन वाघांची झुंज झाली, झालेल्या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाल्याची माहिती वनाधिका-यांना ग्रामस्थांकडून मिळाली. त्यामूळे जखमी वाघावर उपचार करणे आवश्यक असल्याने वनविभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे पशु वैद्यकिय अधिकारी डाॅ.रविकांत खोब्रागडे हे काही अधिकारी आणि कर्मचा-यासोबत डोणीच्या जंगलात गेले. जखमी वाघाला बेशुध्दीचे इंजेक्शन दिल्या नंतर काही वेळाने वन कर्मचारी डाॅ.रविकांत खोब्रागडे यांना घेवून बेशुध्द वाघाजवळ पोहोचले. वाघ बेशुध्द असल्याचे समजुन डाॅ. रविकांत खोब्रागडे वाघावर उपचार करण्यासाठी वाघाजवळ पोहोचताच जखमी वाघाने डाॅ. रविकांत खोब्रागडे यांचेवर हल्ला केला. डाॅ. खोब्रागडे यांचेवर हल्ला होताच सोबत आलेले कर्मचारी सैरावैरा पळाले. वाघाने डाॅ. खोब्रागडे यांचा पाय तोंडात पकडल्याने ते जमीनीवर पडले. वाघापासुन वाचण्यासाठी डाँ. खोब्रागडे यांनी त्याच क्षणी दुसरा पाय वाघाला मारताच वाघाने दुसरा पाय जबडयात पकडला. हल्ला तिव्र करणार त्याच क्षणी डाॅ. खोब्रागडे यांनी सुटकेच्या प्रयत्नात पुन्हा पाय मारल्याने वाघ थोडा शांत झाला. त्याच क्षणी सोबतच्या कर्मचा-यांनी आरडा ओरड करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केल्याने वाघ जंगलात पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात डाॅ.खोब्रागडे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारा करीता चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी वाघावर सुश्रृषा करून सुद्ढ करणा-या डाॅक्टरांवर वाघाने हल्ला केल्याने वनविभागात खळबळ माजली असून वन कर्मचारी जखमी वाघावर नजर ठेवुन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here