रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने वाघीणीचा मृत्यु – डोणीच्या जंगलात घडलेल्या प्रकाराने वन विभाग अस्वस्थ

0
61

मूल (प्रतिनिधी)
विशेष निरीक्षक करतांना वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांना तालुक्यातील डोणी जंगलातील एका झुडपात एक वाघीन मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात अस्वस्थता पसरली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर अंतर्गत चे बफर क्षेत्रातील वन परिक्षेत्र मूल अंतर्गत जानाळा उपक्षेत्रातील डोणी नियतक्षेत्रातील डोणी गांवापासून दिड कि.मी. अंतरावरील कक्ष क्र. ३२७ मधील एका दाट झुडपात एक वाघीन बसून असल्याचे वनविभागाच्या विशेष निरीक्षण करणा-या कर्मचा-यांना दिसून आली. बराच वेळ होवूनही सदर वाघीन न उठल्याने तिच्यावर मागील चार दिवसांपासून निरीक्षण करणारे कर्मचारी तिचेवर नजर ठेवून होते. चार दिवस होवूनही सदर वाघीन झुडपा बाहेर निघत नसून झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामूळे वन कर्मचा-यांना शंका आल्याने त्यांनी तीला उठवण्याचे सोपस्कार केले. तरीही सदर वाघीनीने कोणतीही हालचाल न केल्याने जवळ जावून पाहले असता सदर वाघीन झुडपात मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. जंगलात वाघीन मृतावस्थेत असल्याची माहिती वरिष्ठ वनाधिका-यांना मिळाल्यानंतर वरीष्ठ वनाधिका-यांनी सदर स्थळी भेट देवून पाहणी केली. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांनी दिलेल्या परवानगी अन्वये मृत वाघीणीला चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे आणून शवविच्छेदन केल्यानंतर त्याच परिसरात मृत वाघीनवर अंत्यसंस्कार करण्यांत आले. पशु वैद्यकिय यांच्या शव विच्छेदन तपासणी नुसार सदर वाघीणीचा मृत्यु झालेल्या जखमेमूळे मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव झाल्यामूळे वाघीणीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामूळे झाल्याचे सांगण्यात आले. पाच दिवसांपूर्वी याच जंगलाच्या परिसरात दोन वाघांची झुंज झाल्याची घटना घडली होती, मृत वाघीन त्यापैकीच असावी, असा अंदाज काही वन कर्मचारी व्यक्त करीत असले तरी वरिष्ठ अधिका-यांनी मात्र मृत वाघीणी विषयी कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही. याच परिसरात दोन दिवसापूर्वी वाघांच्या झुंजीत जखमी झालेल्या वाघावर उपचार करण्याकरीता गेलेल्या वन कर्मचा-यांच्या पथकावर एका वाघाने हल्ला केल्याने पशु वैद्यकिय अधिकारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here