ट्रकच्या मागील चाकात आल्याने युवकाचा मृत्यु

0
415

मूल (प्रतिनिधी)
रिमझिम पावसात पुजा साहीत्य घेवुन दुचाकीने घराकडे परत जात असताना अचानक तोल गेल्याने ट्रकच्या मागच्या चाकात येवुन एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना सायंकाळी ५.१५ वा. चे सुमारास घडली. येथील आठवडी बाजारा लगतच्या बेघर वसाहती मध्ये राहणारा अमीत उर्फ बंटी पालु येरमे (१९) येथीलचं श्री साई इंजीनिअरींग वर्क शाँप येथे कामावर होता. सायंकाळी ५ वा. वर्क शाँप बंद झाल्यानंतर अमीत उर्फ बंटी घरी असलेल्या कौटुंबिक पुजेचे हार-फुल व इतर साहीत्य घेवुन मिञाच्या दुचाकीने जात होता. दरम्यान गांधी चौक पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या उपलेटा हाँटेल समोर अमीत उर्फ बंटीचा तोल गेल्याने पाठीमागेहुन चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणारा ट्रक क्रमांक टिएस-२०-६७३४ च्या पाठीमागील चाकात आला. अमीत उर्फ बंटीच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी झालेल्या गर्दीतील नागरीकांकडून अपघाताची माहीती होताच चौकात असलेल्या वाहतुक शिपायांनी घटनास्थळी धाव घेतली, एका वाहणाच्या मदतीने जखमी अमीत उर्फ बंटीला उपचारा करीता उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाँक्टरांनी उपचारापुर्वीच अमीत मृत्यु पावल्याचे सांगीतले. घटनेवरून पोलीसांनी नोंद घेवुन अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेवुन फरार ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रोज मजुरी करून कुटूंब चालविणा-या पालु येरमे यांचा मृतक बंटी उर्फ अमीत हा लहान मुलगा होता. तो होतकरू असल्याने कुटूंबाचा एक आधार गेल्याचे दुःख त्याच्या आई वडींलाना झाले आहे. त्याचे पश्चात एक भाऊ आणि बहीण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here