कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मृतीदिन

0
16

मूल : इंग्रजांच्या राजवटीत स्थायी धर्मांतर, अन्यायी, जुलमी, सावकारी धोरण, महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरुध्द उलगुलान करीत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची दिशा बदलून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या, तत्कालीन अखंड भारतातील तरुणांना देश प्रेमाने प्रेरणा देवुन क्रांतीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मुल शाखेच्या वतीने कौटुंबिक वातावरणात श्रध्दांजली कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शाखेचे अध्यक्ष अशोक येरमे यांच्या अध्यक्षतेखाली चिञकार भारत सलाम यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व मालार्पण करून सामुहीक मौन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अशोक येरमे यांनी शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर थोडक्यात मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आदिवासी विकास परीषदेचे बंडू गेडाम, हेमंत कनाके, दीपक मडावी, बंडू परचके, मनीष कन्नाके, अल्का मडावी, मंजूषा येरमे, अनुसया मडावी, सावित्रीबाई पंधरे, योगिता मडावी, आदी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here