सर्पदंशाने महीलेचा मृत्यू ; बुवाबाजीचा आधार न घेण्याचे अंनिसचे आवाहन

1
520

सर्पदंशाने महीलेचा मृत्यु
मांञीकांचा आधार न घेण्याचे अंनिसचे आवाहण

मूल : (संजय पडोळे)
रोवायला गेलेल्या महीलेला सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार न करता मांञीकाचा आधार घेतल्याने महीलेला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना तालुक्यातील मोरवाही येथे घडली.
मूल पासुन १२ कि.मी. अंतरावर असलेल्या मोरवाही येथील वनिता ओमदेव झरकर (२५) नेहमी प्रमाणे अन्य महीलांसोबत धानाची रोवणी केल्यानंतर पाळीवर उभी असताना काल दुपारी ४.३० वा. चे सुमारास सदर महिलेला विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सदर महीलेला उपचारार्थ दवाखाण्यात न हलविता घरी नेण्यात आले, झालेल्या सर्पदंशावर उपचार करण्यासाठी सावली तालुक्यातील पारडी येथुन नागापूरे नामक मांञिकास आणण्यात आले. सदर मांञीकाने सायंकाळी ६ वा. पर्यत सर्पदंश झालेल्या महीलेवर उपचार केले. परंतु सदर महीला उपचाराला साथ देत नसुन तिची परिस्थिती खराब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागापुरे नामक मांञीकाने सर्पदंश झालेल्या महीलेला दवाखाण्यात हलवावे लागेल असे सांगुन मोकळा झाला, मांञिकाच्या मंञौच्चाराला सदर महीला दाद देत नसल्याने शेवटी सदर महीलेला उपचारार्थ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हालविण्यात आले, राञौ ८.३० वा. चे दरम्यान सदर महीलेला उपजिल्हा रूग्णालयात हलविल्यानंतर तपासणी केली तेव्हा सदर महीला मृत्यू पावल्याचे डाँक्टरांनी सांगीतले, सदर महीलेला सर्पदंश होताच तातडीने उपजिल्हा रूग्णालयात हलविले असते तर योग्य उपचार होवुन तीचा जीव वाचला असता. परंतु वैद्यकीय उपचार न करता मांञिकाचा आधार घेतल्याने पंचेवीस वर्षीय महीलेला जीव गमवावा लागला.
सदर महीलेचा मृत्यू हा जरी सर्पदंशाने झाला असला तरी बुवाबाजी तितकीच कारणीभुत ठरली आहे, मृतक महीलेच्या कुटूंबियांनी मांञीकाचा आधार न घेता तात्काळ वैद्यकीय उपचार घेतले असते तर कदाचित भंजाळी येथील युवकाप्रमाणे नक्कीच तीचाही जीव वाचला असता. असा विश्वास सर्पमिञ तथा अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे तालुका संयोजक उमेशसिंह झिरे यांनी व्यक्त केला असुन सूरू असलेल्या शेतीच्या हंगामात सर्पदंशाच्या घटना घडल्यास मांञीकाचा आधार न घेता रूग्णालयांचा आधार घ्यावा, असे आवाहण केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here