शहरातील भात गिरण्या बंद कराव्या. माजी नगराध्यक्ष रावत आणि बोकारे यांची मागणी

0
139
  • मूल :(संजय पडोळे)
    शहरातील भात गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने शहरातील भात गिरण्या किमान दहा दिवस बंद ठेवाव्या. अन्यथा कोरोनाचा संसर्ग शहरात वाढल्याशिवाय राहणार नाही. अशी भिती माजी नगराध्यक्ष संतोष रावत आणि अरविंद बोकारे यांनी व्यक्त केली आहे.
    तांदळाची मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शाहरातील भात गिरण्यांमध्ये कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांमूळे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन कोरोना बाधीत तालुका म्हणुन मूल तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानावर येत आहे. बिहार मधुन खाजगी बसने आलेल्या ६५ मजुरांपैकी एका बस मधील ३२ प्रवाश्यांपैकी उर्वारीत चार परप्रांतीय मजुरासह भात गिरणी मध्ये दिवाणजी म्हणुन काम करणारा बोरचांदली येथील एका व्यक्तीचा कोरोना तपासणी आहवाल पाँझिटीव्ह आला. यापुर्वी भात गिरणी बाजुला चहा विकणारा शहरातील एक व्यक्ती सुध्दा कोरोना बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज कोरोनाबाधीत सापडलेल्या दिवाणजीच्या संपर्कात आलेल्या तीस ते पस्तीस जणांना कोरोन्टाईन करावे लागले. भात गिरण्यामध्ये काम करण्यासाठी आलेल्या एकुण ६५ मजुरांपैकी काही मजुरांना प्रशासनाने संस्थात्मक विलीगीकरण गृहात न ठेवता काही संधीसाधु मंडळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन भात गिरण्यांच्या परीसरातच गृह विलगीकरणात ठेवले. भात गिरणी मालकांनी मजुरांना विलीगीकरणात असतांनाही कामास लावले तर काही मजुर विलगीकरणात असतांनाही बाहेर फिरत होते. ही कृती विलागीकरण नियमांचे उल्लंघन करणारी असुन कोरोनाचा संसर्ग वाढवणारी आहे. असा आरोप करतांना संतोष रावत आणि अरविंद बोकारे या माजी नगराध्यक्षव्दयांनी विलगीकरणात असणाऱ्या मजुरांना काम करण्यास भाग पाडणा-या भात गिरणी मालकावर प्रशासनाने कारवाई करावी. अशी मागणी केली आहे, आज चामोर्शी मार्गावरील एका नव्या भात गिरणी मध्ये एका परप्रांतीय मजुरासह बोरचांदली येथील एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले असुन तो परीसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केला आहे. तर आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातीला विलगीकरण कक्षात असलेले तीन मजुर कोरोना संसर्गीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. शहरातील शांत आणि निरोगी वातावारणात अचानक परप्रांतीय मजुरांचा शिरकाव झाल्याने शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे, बदलत असलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेलण्यासाठी प्रशासन डोळेझाक करीत असल्याने जिल्ह्याचे पालकमंञी आणि क्षेत्राचे आमादार यांनी लक्ष द्यावे. अशी विनंती संतोष रावत आणि अरविंद बोकारे यांनी स्वतंत्ररित्या केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here