नागरीकांनी भिती न बाळगता तपासणी करावी: डाॅ. सुमेध खोब्रागडे

0
158

कोरोनाची अॅन्टीजल तपासणी मूल शहरात
नागरीकांनी भिती न बाळगता तपासणी करावी: डाॅ. सुमेध खोब्रागडे
मूल: तालुक्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शासनाने ताप, सर्दी, थकवा, खोकला असणाÚया रूग्णांची अॅन्टीजल तपासणी मूल येथील कोविड केंद्रामध्ये सुरू केली आहे, नागरीकांनी कशाचीही भिती न बाळगता आरोग्य कर्मचाÚयांकडे नाव नोंदणी करून अॅन्टीजल तपासणी करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी केले आहे.
बाहेर राज्यातुन चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर नागरीक ये-जा करीत आहेत, प्रवास करणाÚया किंवा कोरोना रूग्णांच्या संपकातुन नागरीकांमध्ये कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे, त्यासाठी नागरीकांकडूनही सहकार्य करणे गरजेचे आहे, कोरोनाचा संसर्ग फैलु नये यासाठी ज्याकुणास ताप, सर्दी, थकवा, खोकल्याची लक्षणे आढळुन आल्यास गावागावात सव्र्हे करणाÚया अंगणवाडी सेविका, आशा यांना माहिती दयावी, अॅन्टीजल तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातुन तपासणी करणे आवश्यक आहे, आरोग्य विभाग, आशा आणि आंगणवाडी सेविकेमार्फत सव्र्हे केलेल्या नागरीकांचीही तपासणी करता येतो, किंवा आरोग्य सेतु अॅप्समार्फतही नोंदणी करता येईल, त्यामुळे नागरीकंानी घाबरून न जाता अॅन्टीजल तपासणी करावी सदर तपासणीसाठी 15 ते 30 मिनीटाचा वेळ लागतो, त्याचवेळी त्याचा अहवाल मिळतो, त्यामुळे ताप, सर्दी, खोकला असणाÚया नागरीकांनी अॅन्टीजल तपासणी करावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here