मूल शहराच्या विकासासाठी प्रयत्नरत : मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम

0
100

मूल शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्नरत
* मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम
मूल/ लोकमत न्यूज नेटवर्क :-
मूल शहराच्या विकासाला चालना देत भरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात मूल शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने काम करण्यात आल्याने उर्वरित कामे नियोजनबध्द आखणी करून मूल शहराच्या विकासाला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहाणार आहे. आतापर्यंत ज्या ज्या नगरपरिषदेत नियुक्ती झाली तिथे आपला कार्यकाळ पुर्ण केला असुन पदाधिकारी व कर्मचारी यांचा योग्य समन्वयक ठेवत मूल नगरपरिषदेच्या विकासाला चालना देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहाणार असल्याचे मत मूल नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी पञकारांसोबत वार्तलाप करताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,कोरोनांचे संकट सध्या जनजीवन विस्कळीत करीत आहे.त्यामुळे कोविड -19 चे निर्मूलन होणे काळाची गरज आहे. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागत आहे. याच बरोबर यापूर्वी सुरू झालेले काम पुर्ण करण्यासाठी नियोजनबध्द आखणी करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवनविन कल्पना साकारण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन विचारमंथन केले जाईल व त्यानंतरही अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या कार्यकाळात मूल शहराच्या विकासाची भरीव कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझ्यासाठी आव्हात्मक असले तरी अशक्य नाही. त्यामुळे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्याने मूल शहराच्या विकासाला चालना देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहाणार आहे. नागरिकांच समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबध्द असुन नियमांच्या अधिन राहुन तात्काळ समस्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहाणार आहे. विकासकामे झाले असले तरी समस्या राहाणार नाही असे मुळीच नाही. माञ त्या समस्या सोडवण्याचा आपला प्रयत्न राहाणार आहे. मोवाड नगरपरिषदेत आपला कार्यकाळ 4 वर्ष पुर्ण झाला. या 4 वर्षाच्या कारकिर्दीत पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी यांच्या समन्वयातून कामे करण्यात आली .त्याच धर्तीवर मूल शहराचा आराखडा तयार करून विकासावर भर देण्याचा आपला प्रयत्न राहाणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य देखिल अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here