अधिकारी—कर्मचा—यांना सूट,महानगरातून येणा—यांना क्वारंटाईन करण्याच्या
आदेशाला केराची टोपली,
सर्व सामान्यांना बंदी ,अप—डाऊन बिनधास्त
मूल :— अधिकारी कर्मचारी नागपूरसह इतर ठिकाणाहून अपडाऊन करतात. कोरोना
संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी लॉकडाउन केली असली
तरी अधिकारी —कर्मचा—यांना मात्र यात सूट दिली आहे. त्यामुळे
सर्वसामान्यांत आश्र्चय व्यक्त होत आहे.
शहरातून अधिकारी—कर्मचारी येत असल्याने मूल शहरात राहणा—या स्थानिक
कर्मचा—यांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत असते.बाहेरून येणा—या
मध्ये शिक्षण,आरोग्य,सामान्य प्रशासन,कृषी,नगरपरीषद कर्मचारी
अधिकारी—कर्मचा—यांचा समावेश आहे. याबाबत कुणीही शब्द बोलायला तयार नाही.
नागपूर वरून येणा—या कर्मचा—यांची तपासणी अथवा वैद्यकिय प्रमाणपत्र ही
घेतले जात नाही. हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र त्याचवेळी
मूल शहरातून कुणी अभ्यागत गेला तर त्याला प्रवेशव्दारावर रोखले जाते.
प्रशासनाची यामागील भूमिका चांगली असली तरी बाहेरून येणारे
अधिकारी—कर्मचारी मात्र याला छेद देत आहेत.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा झाला तर काय ?
असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. अधिकारी व कर्मचा—यांसाठी नियम
वेगळे आहेत काय ? अशीही कुजबूज मूल शहरात दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here