0
68

मुल नगरपरिषद परिसरातील गावठी डुक्करांचा बंदोबस्त त्वरित करा – राकेश रत्नावार
स्वच्छ भारत अभियान पुरस्काराचा गावठी डुकरांकडून फज्जा

■ नगरप्रशासन सुस्त, जनता त्रस्त, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मूल : स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना मूल नगरात राबवून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यांत नगर परिषदेने पुढाकार घेतला. प्रशासनाने आणि मूल वासीय जनतेनी सुध्दा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नगर परिषदेला स्वच्छता अभियानाचा पुरस्कार सुध्दा प्राप्त झाला आहे. अशा विविध कामाचे व कर्तृतवाचे पुरस्कार नगर परिषदेनी शासनाकडून प्राप्त करावे. यात जनतेचीही नां नाही. परंतू मागील दोन महिण्यापासून मूलच्या वार्ड नं. 14 मधील पंचायत समितीच्या आवारात आणि मागील
भागातील वस्तीत वास्तव्य करणा-या नागरीकांच्या घरासमोर गावठी डूकरांने व त्याच्या आठ पिलाने हैदोस माजविला आहे. यापुर्वी एका पथकाव्दारे डूकरांना गावाबाहेर हाकलण्यात आले होते. परंतू परत याच भागात पुन्हा एका गावठी डूकराने आठ पीलांना जन्म देऊन एक कळपच तयार केला आहे. या भागातील नागरीकांच्या अंगणात आणि पंचायत समितीच्या आवारात हा कळप सकाळ-संध्याकाळ मोकाट फिरुन घाण करीत आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी नागरीकांना सहन होईनाशी झाली असून नागरीकांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे.

करीता नगर प्रशासनाने गावठी डूकराच्या कळपाचा त्वरीत बंदोबस्त करुन डूकरांना गावाबाहेर हाकलावे अशी मागणी न.प.चे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केली आहे.

कोरोना विषाणु महामारीच्या प्रादुर्भावात व पावसाळयाच्या दिवसात अणेक वार्डात सुध्दा आतील भागात पाणी साचलेले व चिखल दिसून येत आहे. आणि त्याच चिखलामध्ये या डुकरांचे कळप बसून राहतात व रोडला लागुन असलेल्या नालीच्या घाणीमध्ये सुद्धा बसून असतात व हेच गावठी डुकरे सकाळ पासून रात्रोपर्यंत फिरत असल्याने वार्डातील
नागरीकांच्या अंगणात व आवारात त्यांच्या अंगाला लागुन असलेली घाण पसरत असून त्यांची दुर्गंधी सुध्दा नागरीकांना सहन होत नसल्याने पसरलेल्या घाणीमुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नागरीकांनी वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर हेच गावठी डूकर इतरही वार्डात हैदोस माजवतांना दिसून येत आहेत.

करीता स्वच्छ व सुंदर शहर करण्याच्या संकल्पनेला सुध्दा गालबोट लागु नये यासाठी पंचायत समितीच्या मागील वस्तीतील व इतरही वार्डात हैदोस माजविणा-या गावठी डुकरांच्या कळपाचा नगर परिषद मुख्याधिका-यांनी त्वरीत बंदोबस्त करुन गावाबाहेर हाकलावे अशी मागणी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश रत्नावार यांनी नागरीकांच्या वतीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here