अवघे 3 दिवस : शेतक-यांना आवाहन पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा

0
83

मूल :— शासन निर्णयानुसार पीक विमा योजनेची मुदत 31 जूर्ले पर्यंत आहे. त्यानुसार ज्या शेतक—यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज सादर केलेला नाही,त्यांनी त्वरेने आॅनलाईन अर्ज भरावे. अवघे 3 दिवस  शिल्लक राहिलेले असून,पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी दिसत असल्याने या योजनेपासुन शेतकरी वंचीत राहू नये,यासाठी रविवार या दिवस संचारबंदी तही शेतक—यांसाठी कॉमन सव्हीस सेंन्टर (आपले सरकार केंन्द्र) राहणार आहे.

त्यामुळे मुदतीत सर्व शेतक—यांनी पीक विमा अर्ज आॅनलाईन भरून घेण्याचे आवाहन कॉमन सव्हीस सेंन्टर संचालक प्रमोद मशाखेत्री केलेले आहे.हल्ली पाऊस व्यवस्थित पडत आहे. पीकसुध्दा चांगल्या स्थितीत आहे.त्यामूळे पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित शेतक—यांनी 31 जूर्लेच्या आत कॉमन सव्हीस सेंटरवर आॅनलाईन अर्ज सादर करून लाभ
घ्यावा.सद्यस्थितीत या केंद्रावर गर्दी कमी आहे. 31जूर्ले जवळ येत असल्याने मुदतीच्या आतच शेतकरी पीक विमा योजनेचा प्रत्येक शेतक—यांना भरता यावा, यासाठी कॉमन सव्हिस सेंटरवर गर्दी संचारबंदीही सुरू ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शेतक—यांनी स्वत:काळजी घेत वेळेच्या आत पीक विमा योजनेच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे. पीक विमा योजनेच्या लाभासाठी शेतक—यांना कर्जामधूनही विम्याची रक्कम देता येणार आहे. तशी
तरतूद आॅनलाईन विमा अर्जात आहे. तुंडूब गर्दी होण्याअगोदरच शेतक—यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here