मूल मध्ये कारगिल विजय दिनानिर्मित्य शहिदांना मानवंदना श्रद्धांजली

0
87

मूल :— माजी सैनिक संघटना मूल व भरारी महिला बचत गट तर्फे कारगिल विजयदिन साजरा करण्यात आला. कारगिल युध्दात शहीद झालेल्या विरांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली व मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
26 जूर्ले 1999 ला ज्या विरांच्या शैर्यामुळे कारगिल वर विजय प्राप्त करता आला व भारताची सिमा सुरक्षित राहिली अश्या विरांना शतश:नमन करीत नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी आव्हान केले की,आज देश कोरोनामुळे भयभीत झालेला आहे आपण सर्वांची जबाबदारी आहे कि, प्रत्येकानी योध्दा बनून कोरोनाविरूध्द लढायचे आहे.तेव्हाच आपण हया समस्येतून बाहेर पडू शकतो. तेव्हा सामाजिक अंतर,सार्वजनिक ठिकाणी मास्क व सेनिटायझरचा वापर करावा असे बोलत होत्या. यावेळी मुलच्या नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी मेश्राम , सैनिक संघटना अध्यक्ष एकनाथ गडेकर, महिला बचतगट अध्यक्ष अंजली सूर,माजी सैनिक तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचलन विजय भसारकर यांनी केले. तर के.टी. खोब्रागडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here