गुजरी चौक झाले डंपिंग यार्ड,

0
345
  1. मुल (रविंद्र बोकारे)ऐकेका

    मुल (रविंद्र बोकारे)   एकेकाळी वैभवाची  असलेले मूल मधिल गुजरी चौक  नगरपरिषदेचे घाण कचरा टाकण्याचे डंपिंग ग्राउंड होत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.मागील अनेक दशकापासून मूलचे गुजरी चौक हे शहरातील सर्वात गर्दीचे आणि भरभराटीचेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. रोजच्या गुजरी बाजारासह, किराणा अनाज मेडिकल चे मोठे दुकाने, शहीद स्तंभ, नगर पालिका कार्यालय, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे निवास यामुळे हा परिसर नेहमी वर्दळीचा ठिकाण राहिलेला आहे. नगर परिषदेने गुजरी चौकाचे सौंदर्यीकरण केले. त्यात सिमेंट ची फरशी, गट्टू लावून चिखलमय होणारा हा भाग विकसित केला मात्र मागील काही दिवसापासून नगरपरिषदेने तीन ट्रॅक्टर टाकाऊ झालेला भाजीपाला व इतर साहित्य या चौकात ट्रॅक्टरने आणून ठेवले जातात. यातील घान पाणी सबंध गुजरीत परिसरात ओसंडून वाहतात आणि त्याची दुर्गंधी परिसरातील नागरिकांना सहन करावी लागत आहे. एकीकडे नगरपरिषदेने गुजरी चौकाचे सौंदर्यीकरण केले तर दुसरीकडे ट्रॅक्टरने घाण कचरा आणून याचा डम्पिंग ग्राउंड तयार केले. या कचऱ्यातील घाणीमुळे परिसरात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here