विजबील माफ करा — आम आदमी पार्टीची मागणी

0
118
विजबील माफ करा — आम आदमी पार्टीची मागणी
महावितरण उपविभागीय कार्यालय तर्फे मुख्यमंत्राना देण्यात आले निवेदन
तिप्पट वीजबिलाने ग्राहक झाले त्रस्त
भरमसाठ विज बिलाने ग्राहकांचे मोडले कंबरडे 
मूल/प्रतिनिधी
    लॉकडाउनच्या काळात मीटर रीडिंग न घेता ग्राहकांना महावितरणने मागील वर्षीच्या वापरानुसार एप्रिल, मे या दोन महिण्यात सरासरी वीजबिल दिले. आता जून महिण्यात महावितरनणे ग्राहकांच्या घरोघरी जावून मिटर रिडींग घेतली. 3 महिन्याची एकदम रींडीग वाढल्याने त्या नुसार महावितरनणे ग्राहकांना विधुत बिल पाठविले. जून महिण्यात घरोघरी पोहचलेल्या विद्युत बिलातील वाढलेली रक्कम पाहून ग्राहकांना लॉकडाउनचा चांगलाच झटका बसला आहे. 
  वीजबिलात दुप्पट ते तिप्पट रक्कम दिसत असल्याने ग्राहकांची ओरड वाढली आहे तसेच महावितरणा विरूध्द असंतोष व्यक्त होत आहे. मासिक सातशे रूपये येणारे बिल,आता पाच ते
सहा हजार रूपया पर्यंत गेले आहे. शेतकरी, शेतमजूर, तसेच सर्वसामान्य नागरीक, लघू व्यवसायीक, यांचे विजबिलातील रक्कम पाहून कबरडेच मोडले आहेत.
     महावितरण कडून लॉकडाउन काळातील वीजबिल अनेक ग्राहकांना तीन महिन्यांचे एकत्रित देण्यात आले आहे. यावेळी मीटर रिडिंग घेऊन वीजबिल वाटप केल्याचा दावा कपंनीकडून केला जात आहे. मात्र, ग्राहकांची याबाबत नाराजी आहे. अनेक ग्राहकांनी वीजबिलावर आक्षेप घेतला आहे. ज्या ग्राहकांना दरमहा सहाशे ते सातशे रूपये वीजबिल येत होते.त्या ग्राहकांना यावेळी चार ते साडेचार हजार रूपये वीजबिल आले आहे. घरगुती ग्राहकांच्या विजबिलात अचानकपणे झालेली वाढ ग्राहकांना शॉक देणारी ठरत आहे. यावेळी वीजबिलासंदर्भात जवळपास सर्वच ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ग्राहक महावितरणाच्या नावाने ओरडत आहेत. त्यामुळे येणा—या काळात महावितरण कर्मचा—यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. अनेकांनी तर अधिकारी कर्मचा—यांना जाब विचारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता महावितरण या संदर्भात काय निर्णय घेणार,याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
    महावितरण ग्राहकांची ओरड पाहून प्रत्येक ग्राहकांस मोेबाईलवर विज बिलाच्या संदर्भात मॅसेज पाठवित आहे त्यामध्ये महावितरणची लिंक देवून त्यावर किती विज वापरली आणि त्यानुसार किती बिल आले याविषयी माहिती देत असली तरी ग्राहकांचे यामुळे समाधान होत नाही आहे. महावितरण मागील वर्षीचे विज बिल आणि आताच्या विज बिलाची तफावत यावर्षी माहीती देवून ग्राहकांना विजबिल भराण्याशिवाय पर्यायच नाही असा एकप्रकारे ग्राहकांना आदेशच देत असल्याचे ग्राहकांकडून ओरड आहे. 
    भरमसाठ आलेल्या विजबिलात शासनाने आणि महावितरणाने सुट दयावी अशी मागणी  ग्राहकानी केली आहे. म्हणून आम आदमी पार्टीकडून महावितरण उपविभागीय कार्यालय मुल तर्फे मुख्यमंत्राना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष गौरव शामकुळे, आप चे कार्यकर्ते अमित राउत, प्रणय दागमवार, पियुष रामटेके, महेश दुधबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here