मूल तालुक्याचा 10 वी चा उत्कृष्ठ निकाल !

0
173
    1. मूल:—
      मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वी च्या परिक्षेचा निकाल आज घोषीत करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा मुल तालुक्याचा निकाल समाधानकारक असल्याचे दिसुन येते. मूल तालुक्यातुन 1735 परिक्षार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी 1644 परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असुन निकालाची टक्केवारी 94.75 आहे.
      या निकालात देवनिल विद्यालय टेकाडी, सेन्ट अॅनेस हायस्कुल मूल, स्व.चंद्रचुड विद्यालय चिखली, माउन्ट हायस्कुल मुल व आनंद विद्यालय केलझर या पांच ही शाळेचा निकाल 100 टक्के लागला असुन न.भा. विद्यालय मुल 92.50, न.भा. कन्या विद्यालय, मूल 97.51, स्वामी विवेकानंद विद्या मंदीर मूल 97.91, शरदचंद्र पवार विद्यालय भेजगांव 99.18, राष्ट्रमाता विद्यालय देवाडा 98.43, आनंद विद्यालय बेंबाल 89.47, न.भा. विद्यालय राजोली 98.87, विश्वशांती विद्यालय मारोडा 92.50, स्व. बापुजी पाटील हायस्कुल राजगड 95, विवेकानंद विद्यालय बेंबाळ 96.59 टक्के निकाल लागला असुन अन्य शाळांचा निकाल सुध्दा समाधानकारक आहे.मूल तालुक्यात सर्वात कमी निकाल श्रीमती विठाबाई मुन अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चा निकाल 80.76 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here