सेन्ट अॅनेस हायस्कुल मूल च्या विद्याथ्यांनी बाजी मारली !

0
164

मूल:—
मार्च 2020 मध्ये म.रा. बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या 10 वी चा निकाल आज घोषीत करण्यात आला. मूल येथील सेन्ट अॅनेस हायस्कुल चा निकाल 100 टक्के लागला असुन या शाळेतील 25 विद्याथ्यांनी 95 टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. या शाळेची कु. लावण्या लाडवे 97.20, कु. डॉली गुरुनानी 96.80, प्रतिक दुर्गे 96.80, कु. विदीशा मुन 96.20, जयदीप कटकमवार 96, कु. साक्षी वाढई 95.60 आणि कु. दिशा टहलियानी ने 95.20 टक्के गुण प्राप्त करुन शाळेचे नाव उज्वल केले आहे. सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शॅलेट सॅबेस्टीयन आणि शिक्षकवृंदानी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here