लावण्या लाडवे तालुक्यात प्रथम, तालुक्याचा निकाल 94.75 टक्के

0
164

मूल (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या निकालात तालुक्याचा निकाल 94.75 टक्के लागला आहे. तालुक्यात 1735 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी 1644 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जाहीर झालेल्या निकालात देवनीय विद्यालय टेकाडी, सेंट अॅन्स हायस्कंुल मूल, स्व.चंद्रचुड येनुरकर विद्यालय चिखली, माऊंट हायस्कंुल मूल आणि आनंद विद्यालय केळझर या पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्थानिक सेंट अॅन्स हायस्कुल येथील लावण्या प्रशांत लाडवे हीने 97.20 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याच विद्यालयाची विद्यार्थीनी डाॅली गुरूणानी आणि प्रतिक दुर्गे या दोघांनीही 96.80 टक्के समान गुण मिळवून तालुक्यात द्वितीय तर विधीशा मुन हीने 96.20 टक्के गुण मिळवून तिसÚया क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सदर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून 23 विद्याथ्र्यांना 90 टक्के गुण मिळविले आहे. स्थानिक माऊंट काॅन्व्हेंटचा निकाल शंभर टक्के लागला असून माही अरोरा ही शाळेत प्रथम, जानवी गुंडावार दुसरी तर मनिषा मेहता तृतिय आली आहे. स्थानिक स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथील आचल कामडे प्रथम, प्रज्वल रामटेके दुसरा आणि जानवी लेनगुरे ही तिसरी आली आहे. नवभारत विद्यालय येथे भैरवी सहारे प्रथम आली असून कुणाल लेनगुरे द्वितीय आणि अक्षय जेड्डीवार तिसरा आला आहे. नवभारत कन्या विद्यालय येथे ऐश्वर्या पिरसुंगलवार प्रथम आली तर दिपा वाढई दुसरी आणि समिक्षा वाकडे तिसरी आली आहे. विश्वशांती विद्यालय मारोडा येथे सौरभ भुपतवार प्रथम आला आहे, शिवानी शेंन्डे दुसरी तर नंदीनी तर्रेवार ही तिसरी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here