विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था केल्यानंतरच शाळा सुरु कराव्यात. शोभाताई फडणविस यांचे मत..

0
232

मूल..
सध्याच्या परिस्थितीत कोरोना चे संक्रमण वाढत असतांना शाळा सुरु करण्याची घाई न करता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्व सुरक्षात्मक व्यवस्था प्रशासनाद्वारे करुन नंतरच शाळा सुरु व्हावी, असे मत राज्याच्या माजी मंत्री व शाळा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई फडणविस यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद विद्या मंदीर शाळेच्या 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या छोटेखानी स्वरुपात आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले. या शाळेतुन कु. आँचल कामडे प्रथम तर प्रज्वल रामटेके आणि कु. जान्हवी लेनगुरे यांनी क्रमश द्वीतिय आणि तृतिय स्थान पटकाविले.या शाळेचा यावर्षीचा निकाल 97.91 टक्के लागला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक संतोषभाऊ रावत, डाँ. आशिष कुळकर्णी, देवराजभाई पटेल, दिलीपभाई सुचक, अनिल संतोषवार व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तु देउन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिक्षकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सरकारने शिक्षक भर्तीसाठी परवानगी द्यावी, असे मत व्यक्त करतांना श्रीमती फडणविस यांनी नविन जाहिर झालेल्या शैक्षणिक धोरणाबाबत सांगितले की चांगल्या बाबींची प्रशंशा केलीच पाहिजे. या शाळेचा उत्तम निकाल लागतो ही परंपरा असल्याबाबत बोलतांना त्यांनी सद्य स्थिती लक्षात घेता सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात आणखी कपात करणे आवश्यक राहील, असे विचार मांडले. ग्रामीण भागातुन येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय कशी होईल, या बाबतीत सुध्दा विचार करणे, गरजेचे राहील, असे सांगितले .
या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन गाजेवार सर यांनी तर आभार प्रदर्शन गुरुनुले सर यांनी केले. …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here