निराधारांना तात्काळ लाभ देण्यात यावा …

0
163

 

उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

मागील सहा महिन्यांपासून मूल तालुक्यातील श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या सर्व योजनेचा नव्याने अर्ज दाखल केलेल्या निराधारांना लाभ मिळालेला नाही. कोरोनाच्या संकटकाळात निराधारांचे आर्थिक परिस्थिती खालावलेली असून अजून पावेतो निराधारांना त्यांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधार योजनेचे लाभार्थी प्रतीक्षा करत अाहेत.जानेवारी महिन्यापासून सदर योजने संदर्भातली कोणतीही मीटिंग घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन पात्र निराधारांना लाभ देण्याचे करावे. मूल तालुक्यातील नव्याने अर्ज दाखल केलेल्या पात्र निराधार यांना तात्काळ त्यांचा लाभ देण्यात यावा करिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा तहसीलदार मूल यांना निवेदन देण्यात आले.
जर एका आठवड्याच्या आत पात्र निराधार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही तर उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा उलगुलान संघटना शाखा मुल देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटना शाखा मंचचे अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर,वतन चिकाटे, सुजित खोब्रागडे, प्रतीक खोब्रागडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here