राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

0
136

राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमूळे सामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. शहरात कार्यरत असलेल्या बँकांपैकी तीन बँकेचे कर्मचारी सामान्य ग्राहकांशी नेहमी अरेरावीने वागतात. श्रीमंत, परीचित किंवा व्यापारी गेल्यास त्यांना व्हीआयपी वागणुक दिल्या जाते. प्रसंगी खुर्चीही मिळते. परंतु सामान्य किंवा शासकीय योजनेचा लाभार्थी गेल्यास त्यांना असभ्यपणाची वागणुक दिल्या जाते. अडचणीच्या प्रसंगी विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांवर मोठ्या आवाजात, तिरकस डोळ्याने पाहत त्यांच्या अडचणीचे निराकरण न करता त्यांना विचारा तर कधी या दिवशी या. म्हणुन वेळ मारून नेल्या जात असल्याचे अनेकदा दिसुन आले. त्यामूळे मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here