चिमढा जवळ अपघात-दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

0
142
  1. मूल :
    मूल गडचिरोली महामार्गावर विरूध्द दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने दुचाकी स्वारास चिरडल्याने दुचाकी स्वार जागीच मृत्यु पावला.
    राञौ ७.४५ वा. सुमारास सीजी-०४-एमएस-१८०७ क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून गडचिरोली जात होता. दरम्यान एमएच-३४-एडब्लु-६६८८ क्रमांकाच्या अँक्टीव्हा गाडीने एक जण मूलकडे येत असताना चिमढा या गावाजवळ ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकने दुचाकीला काही अंतरापर्यत ढकलत नेले. झालेल्या भिषण अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर अँक्टीव्हा चेंदामेंद झाली. अपघाताची माहीती होताच चिमढा वासियांनी धाव घेताच अपघातग्रस्त ट्रकचा चालक पसार झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले परंतु वृत्त लिहेपर्यंत मृतक दुचाकीस्वाराची ओडख पटलेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here