नगर सेवक महेद्र करकाडे यांना जामीन मंजुर

0
548
  • मूल : नगर परीषदेचे तत्कालीन स्थापत्य अभियंता प्रसाद राठोड यांना केलेल्या मारहाण प्रकरणात आरोपी ठरविलेल्या नगरसेवक महेंद्र करकाडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्यायमुर्ती मनिषजी पितळे यांनी अंतरीम जामीन मंजुर केला आहे. ९ आँगस्ट रोजी नगर सेवक महेद्र करकाडे यांनी नगर सेवकांचे म्हणणे ऐंकुन न घेता मनमानी करतो, या कारणावरून नगर परीषद कार्यालयात स्थापत्य अभियंता प्रसाद राठोड यांना मारहाण केली होती, त्यामूळे नगरसेवक महेद्र करकाडे यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा नोंदविला. सदर प्रकरणी पोलीसांकडून होणारी अटकेची कारवाई टाळण्यासाठी नगर सेवक करकाडे ९ आँगस्ट पासुन अज्ञातवासात होते, दरम्यान जिल्हा न्यायालयाने करकाडे यांना अटकपुर्व जामीन देण्यास नाकारले होते, त्यामुळे करकाडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जामीनासाठी विनंती केली होती. आज कामकाजाच्या पहील्याच तासात करकाडे यांच्या याचीकेवर चर्चा होवुन न्यायमुर्ती मनिष पितळे यांनी करकाडे यांना अंतरीम जामीन मंजुर केला. करकाडे यांचे बाजुने न्यायालयात अँडव्होकेट रितेश टहलीयानी यांनी युक्तीवाद केला. नगर सेवक महेद्र करकाडे यांना न्यायालयाने जामीन मंजुर करताच सहकारी नगरसेवक आणि मिञ मंडळीनी न्यायालयाचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here