मूल तालुक्यात आज 5 कोरोना रुग्णाची नोंद

0
260

मूल तालुक्यात आज 5 कोरोना रुग्णाची नोंद
मूल : मूल तालुक्यात कोरोना रुग्णात वाढ होत असतानाच आज मुल तालुक्यात 5 व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये आर टी पी सी आर तपासणीत 3 तर अँटीजेन तपासणीत 2 व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे मूल तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूल तालुक्यात काल पर्यंत कोरोना रुग्णांनी संख्या 126 वर पाहोचली होती आज त्यात 5 रुग्णाची भर पडली. मूल तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे, मूल येथील पत्रकार भावनांमध्ये आज चिरोली येथील एक 26 वर्षाची महिला, तर मूल येथील वार्ड न 14 मधील एका युवकांची अँटिजेल तपासणी पॉसिटीव्ह आली आहे. आर टी पी सि आर तपासणी मध्ये आसाम वरून आलेला मिल्ट्री मधील एक जवान मूल येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात होता त्याचा कोरोना रिपोर्ट आज पॉसिटीव्ह आला, त्यासोबतच एक महिला आणि एका युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. आज अँटीजेन तपासणीत 2, आर टी पी सी आर तपासणीत तिघांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे.
यामध्ये मूल येथील 4 आणि चिरोली येथील एका महिलेचा समावेश आहे,
नागरिकानी प्रशासनकडून वारंवार दिलेल्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार डी जी जाधव यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here