मूल नगर परीषदेचे ४६ कर्मचारी कोरोन्टाईन

0
608

मूल : नगर परीषद मध्ये पंतप्रधान आवास योजनेत कंञाटी तत्वावर काम करणारा एक अभियंता अँन्टीजेन तपासणी मध्ये कोरोना बाधीत आढळला. त्यामूळे नगर परीषदेत खळबळ माजली असुन परीषदेच्या मुख्याधिकारी आणि चार महीला कर्मचाऱ्यांसह ४५ कर्मचाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी सध्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आहेत. अलगीकरणात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची हाय रिक्स व लो रिक्स तपासणी करण्यात आली असुन उद्या संध्याकाळ पर्यंत तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे. कोरोना बाधीत सापडलेल्या सदर कर्मचाऱ्याचा काल दुचाकीने किरकोळ अपघात झाला होता. अपघातामूळे झालेल्या जखमांवर उपचार केल्यानंतर काल राञौ सदर कर्मचाऱ्यास ताप आला, म्हणुन सदर कर्मचाऱ्याने आज स्थानिक पञकार भवन येथील अँन्टीजन तपासणी केन्द्रात तपासणी केली होती, त्यामध्ये अहवाल पाँझीटिव्ह आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली, दरम्यान सदर कर्मचाऱ्याचे सहवासात आलेल्या व अन्य कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून सुरक्षित राहावे. असा निर्णणय घेवुन मुख्याधिकारी यांनी स्वतः पासुन तपासणीला सुरूवात करून घेत संस्थात्मक अलगीकरण झाले. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल येईपर्यंत नगर परीषदेचे कामकाज ठप्प राहील. हे तेवढच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here