पोलिस विभाग व नगर परिषद ची मास्क न वापरणा-यावर कारवाई….

0
79

मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना चा आकडा दररोज वाढत आहे. असे असुन सुध्दा नागरिक बाहेर फिरताना किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क  चा वापर करीत नसल्याचे दिसत आहे.

म्हणुनच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा जोर वाढविण्यात येणार आहे. 

 सामाजिक अंतराच्या नियमांकडे तर सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. 

यासाठी पोलिस विभाग  व नगर परीषद  कडून  गांधी चौकातच मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई सुरु  केली आहे. प्रवासी कारमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्यावर कारवाई करून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.  ही कारवाई  काही ठिकाणीच होत आहे.  मात्र शहरात मोठ्या प्रमाणात मास्कची कारवाई केली जाणार आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here