मूल येथे करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

0
71

मूल (प्रतिनिधी)
करीयरच्या बाबतीत संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना करीयरच्या निवडीसाठी दिल्या जाणा-या विविध स्पर्धा परिक्षा आणि त्याचा अभ्यासक्रम व प्रश्नांची माहिती व्हावी या उद्देशाने शनिवार दिनांक 20 फेबु्रवारी 2021 रोजी स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात संध्याकाळी ५ वा. करीअर  मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत केला आहे. डाॅ. पुर्वा तारे द्वारा आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्याथ्र्यांना करीअर निवडी बाबत मार्गदर्शन करण्यांत येणार आहे. मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यांत आलेल्या सदर कार्यक्रमात सहायक पोलीस अधिक्षक तथा मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे उपस्थितांना युपीएससी व एमपीएससी सोबतचं इतर स्पर्धा परिक्षां बाबत मार्गदर्शन करणार आहेत. आयोजीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 200 रूपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारण्यात येणार असून एका विद्यार्थ्यां सोबत एका पालकांना विनामूल्य प्रवेश दिल्या जाणार आहे. आयोजीत करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होवू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी डाॅ. पुर्वा तारे यांचेशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले असुन कार्यक्रमाला येणाऱ्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवुन मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. असे सुचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here