जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्याला मदत

0
62
  • मूल (प्रतिनिधी) शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मागील सहा वर्षापासुन शेतकरी कल्याण योजना राबविल्या जाते. या योजने अंतर्गत दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आजारावर उपचार करण्या करीता आर्थिक सहकार्य केल्या जाते. या योजने अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मूल शाखेच्या वतीने तालुक्यातील आकापुर येथील शेतकरी रमेश झुंगरु येरमे यांना त्यांची पत्नी सौ नम्रता रमेश येरमे यांना कँन्सर आजारावर उपचार करण्याकरिता ४० हजार रूपयाचे आर्थिक सहकार्य करण्यांत आले. बँकेच्या संचालक कक्षात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या हस्ते पती रमेश येरमे यांना धनादेश देण्यात आले. बँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्ग 40000 चा धनादेश मा. संतोषभाऊ रावत यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती संदिप कारमवार, बँकेचे हितचितंक तथा निवृत्त शाखाधिकारी नंदकिशोर मडावी आणि शाखा व्यवास्थापक वाळके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here