खाजगी डाँक्टर कोरोना लसीकरणाचा डोस पासुन वांचित-लसीकरणाचा लाभ मिळावा. मेडीकल प्र्ँक्टीशनर असोसिएशनची मागणी

0
71
  • मूल (प्रतिनिधी)
    रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद डोळयासमोर ठेवून कोरोना काळात विविध प्रकारच्या आजारासंबंधी नागरीकांची सुश्रृषा करणा-या स्थानिक खाजगी डाॅक्टर व पॅथालाॅजी धारकांना कोरोना लसीकरणाचा लाभ न मिळाल्याने स्थानिक खाजगी डाॅक्टर नाराज असुन आरोग्य सेवा पुरविणा-या तालुक्यातील खाजगी डाॅक्टरांना कोरोना लसीकरणाचा डोस दिल्या जावा. अशी मागणी केली आहे. मेडीकल प्रॅक्टीशन असोसिएशन मूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात जीवाची तमा न बाळगता प्रशासनाला सेवा पुरवून सहकार्य करणा-या प्रशासनातील महत्वाच्या घटकांचे आरोग्य भविष्यात सुदृढ राहावे म्हणून प्रशासनाच्या वतीने संबंधीत अधिकारी आणि कर्मचा-यांना कोविद 19 लसीकरणाचा पहिला डोस देण्यांत आला. लसिकरणाच्या डोसचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून नुकताच दुसरा टप्पा सुरू झाला आहे. असे असतांना मूल शहर आणि तालुक्याच्या विविध भागात जनतेला आरोग्याची सेवा पुरविणा-या डाॅक्टर, तेथील कर्मचारी आणि पॅथालाॅजी धारकांना लसिकरणाचा पहिला डोस मिळाला नाही. कोरोना काळात शासकिय डाॅक्टरां सोबतचं खाजगी डाॅक्टरांनी सुध्दा नागरीकांना आरोग्याची सेवा पुरविली असल्याने कोरोनाचा प्रसाराला आळा बसला आहे. ही वास्तविकता असल्याने प्रशासनाने खाजगी डाॅक्टरांना लसीकरणाचा लाभ मिळावा म्हणून माहिती मागविली होती. त्यानुसार खाजगी डाॅक्टरांनी संबंधीत विभागाकडे आयडी क्रमांकासह संपुर्ण माहिती दिली आहे. त्यामूळे लसीकरणाचा पहिला डोस नाही तर किमान दुसरा डोसचा तरी लाभ मिळावा अशी खाजगी डाॅक्टरांची अपेक्षा आहे. परंतु लसीकरणा संबंधी आरोग्य विभागाकडून आजपर्यंत कोणतीही सुचना मिळालेली नाही. कोरोना सदृश्य काळात नागरीकांना आरोग्याची सेवा पुरविल्या असतांना आरोग्य विभाग खाजगी डाॅक्टरांना डावलत असून प्रशासनाच्या इतर विभागातील अधिका-यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना मात्र लसीकरणाचा पहिल्या व दुस-या डोसचा लाभ दिल्या जात आहे. ही बाब खेदजनक असून नागरीकांना थेट आरोग्य सेवा पुरविणा-या खाजगी डाॅक्टरांना जर प्रशासन लसीकरणाचा लाभ देत नसेल तर पुढील काळात प्रशासनाला आरोग्याच्या बाबतीत सहकार्य करावे कसे, असा प्रश्न खाजगी डाॅक्टरांसमोर निर्माण झाला आहे. त्यामूळे नागरीकांना आरोग्याची सेवा पुरविणा-या खाजगी डाॅक्टरांना प्रशासनाने कोरोना लसीकरणाचा डोसचा लाभ देण्यांत यावा. अशी विनंती मेडीकल प्रॅक्टीश्नर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. सुभाष बुक्कावार, सचिव डाॅ. विनोद चौधरी, कोषाध्यक्ष डाॅ. मार्टीन अझीम, सदस्य डाॅ. आशिष कुलकर्णी, डाॅ. दिनेश व-हाडे आदिंनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here