मास्क वापरा …..कोरोना पासुन स्वत:ला वाचवा…..प्रशासनाची दंडात्मक कारवाई !

0
69
  1. मूल:—
    सद्यस्थितीत कोरोना संक्रमणाची वाढत असणारी परिस्थीती लक्षात घेउन मूल येथील पोलीस विभाग, तहसील प्रशासन व नगर परिषद प्रशासनाच्या स​हकार्यातुन नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आव्हान करुन मास्क न वापरणा—या लोकांकडुन दंड वसुल केला जात आहे. पोलीस विभाग, तहसील प्रशासन व नगर परिषद च्या सहकार्याने वेगवेगळी 10 पथके तयार करुन शहरात रस्त्यावर फीरणारे नागरिक तसेच व्यापारी प्रतिष्ठानात प्रत्यक्ष भेट देउन मास्क न वापरणा—या लोकांकडुन दंड वसुल केला आहे. वारंवार सुचना देउन सुध्दा नागरिक निष्काळजीपणाने वागत आहे, म्हणुनच ही कारवाई करावी लागत आहे. भविष्यात कोरोनाची बिकट परिस्थीती निर्माण होउ नये, यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here