रेल्वे स्टेशन मार्गाच्या दुरूस्ती करीता निधी देण्याची मागणी. नगरसेवक फुलझेले यांनी दिले खासदार धानोरकरांना निवेदन

0
92

मूल : (प्रतिनिधी)
मूल चंद्रपूर महामार्गापासुन मूल रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग खड्डेमय झाल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, खड्डेमय झालेल्या या मार्गावर अनेक किरकोळ अपघात झाले असुन वृध्दांना ये जा करणे शारिरीक दृष्ट्या वेदनादायी ठरत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासुन सुधारणेच्या प्रतिक्षेत असलेल्या रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी खासदार स्थानिक विकास निधी मधुन आर्थिक सहकार्य करून नागरीकांना दिलासा द्यावा. अशी मागणी मूल नगर परीषदेच्या सदस्या ललीता फुलझेले यांनी केली आहे.
मूल येथील रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता पुर्णपणे खड्डेमय झालेला आहे, यामार्गावर अनेकदा डागडुगीचे काम करण्यात आले मात्र काही दिवसातच रस्ता उखळुन गेल्याने यामार्गावरून जाणा-या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आँटोने जाणा-या प्रवाश्यानाही आपला जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोना संक्रमणामुळे मूल येथुन धावणारी गोंदीया बल्लारपूर रेल्वे बंद आहे. परंतु सायंकाळी फिरणारे नागरीक यामार्गाने मोठया प्रमाणावर ये-जा करीत असतात. यामुळे या मार्गाच्या डांबरीकरणासाठी खासदार निधी मधुन निधी उपलब्ध करून तात्काळ रस्त्याचे काम करण्यात यावे. अशी मागणी मूल नगर परीषदेच्या सदस्या ललीता फुलझेले यांनी क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर यांना मूल येथील विश्राम गृहात भेटुन केली आहे. यावेळी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार, कैलास चलाख, नगरसेवक विनोद कामडी, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, गणेश खोब्रागडे, प्रदीप कामडे उपस्थित होते. भेटी दरम्यान खा. धानोरकर यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले असुन येत्या काही महीण्यात कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here