*उलगुलान संघटनेची मुल तालुका कार्यकारणी जाहीर* *उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी गठित.* 🍁🍁🍁🍁🍁

0
49

आज दिनांक 17 मार्च 2021 ला मुल येथे उलगुलान संघटनेची बैठक घेण्यात आली. मूल तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे बैठकीला उपस्थित होते. राजू झोडे यांच्या नेतृत्वात उलगुलान संघटना तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली.
उलगुलान संघटना तालुका अध्यक्ष म्हणून रोहित बोभाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून स्वागत वनकर, किशोर पगडपल्लीवार, सम्राट मानकर यांची निवड करण्यात आली. महासचिव अनील नाहगमकर, आकाश गवडेवार,आशिष कोल्हे तर कोषाध्यक्ष आकाश दहिवले सचिव विकास टेकरे यांची निवड करण्यात आली. उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here