*नवा गडी-नवा कारभारी* शहर स्वच्छतेसाठी न.प.सज्ज

0
147

मूल (प्रतिनिधी)
स्वच्छ आणि सुंदर शहर निर्मितीचा ध्यास घेतलेल्या मूल नगर परिषदेच्या वतीने कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि शहरातील नाल्यांच्या सफाईचा कामाचा शुभारंभ नुकताच करण्यांत आला. चालू वर्षात शहरातील कच-याचा विल्हेवाट आणि शहरातील नाल्यांची सफाईचा कंत्राट नागपूर येथील वेट हॅडलींग कंपनीने घेतला आहे. सदर कंपनीने घेतलेल्या कामाची सुरूवात मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते करण्यांत आला. यावेळी नगराध्यक्ष भोयर यांनी कंपनीच्या वतीने शहरातील विविध वार्डात कचरा संकलना करीता फिरणा-या वाहणांना हिरवी झेडी दाखविली. सदर कंपनीच्या वतीने कचरा संकलना करीता एकुण आठ वाहण शहराच्या विविध वार्डात फिरणार असून त्याकरीता आवश्यक मणुष्यबळही नियुक्त करण्यांत आले आहे. स्वच्छ व सुंदर शहराचा पुरस्कार मिळालेले मूल शहर याहुन अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सदर कंपनी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन यावेळी कंपनीच्या वतीने देण्यात आले. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनीही कंपनी सोबतचं नागरीकांनीही मूल शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे. अशी विनंती केली. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक अनिल साखरकर, विनोद कामडे, ललिता फुलझेले यांचेसह नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here