रंग मारण्याच्या सिडीवरून पडून मजुराचा मृत्यु

0
297

मूल (प्रतिनिधी)
नगर परीषदेच्या नवीन इमारतीला रंग मारणाऱ्या एका मजुराचा झुल्यावरून पडून मृत्यु झाल्याची घटना आज मूल शहरात घडली.
गुजरी चौकात असलेल्या मूल नगर परीषदेच्या जुन्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. तीन मजली इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असुन इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. इमारत तीन मजली असल्याने दोरावर सिडी तयार करून बाहेरून रंग मारणे गरजेचे आहे. त्यामुळे पंकज प्रभाकर खोबरागडे (३२) रा. मूल हा आज सकाळी ११.३० वा. सुमारास दोरावरील झुल्यावर बसुन तीस-या माळ्यावर रंग मारत असतांना अचानक सिडीसहीत जमीनीवर कोसळला. पंकज खोबरागडे जमीनीवा पडताच आजुबाजुला असलेले लोक व सदर कामाच्या कंञाटदाराने जखमी पंकजला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती केले. परंतु पंकजच्या कंबर आणि पाठीला जबर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथील डाँ. आंबटकर यांचे कडे हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाही पंकजच्या परीस्थितीत सुधारणा होत नसल्याचे दिसुन आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असतांना दुपारी ४.४५ वा. सुमारास पंकजचे निधन झाले. मृतक पंकजचे कुटूंब माजी मंञी शोभाताई फडणवीस यांच्या कुटूंबाशी घनिष्ठ असल्याने शोभाताई फडणवीस यांनी पंकजच्या उपचारासाठी प्रयत्नशील राहील्या. परंतु पंकजच्या आजच्या न.प. इमारतीला रंग मारण्याच्या पहील्याच दिवशी शेवटी नियतीनेच डाव साधला. मृतक पंकजच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि आई, वडील, काका-काकु व भाऊ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here