बाईक रँलीने केली महावितरणने जनजागृती

0
42
मूल (प्रतिनिधी)
महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत तालुक्यातील कृषी पंप धारकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने मूल येथील महावितरण उपविभागाच्या संचलन व सुव्यवस्था शाखेच्या वतीने जनजागृती करण्यासाठी मोटार सायकल बाईक रॅली काढण्यांत आली. स्थानिक नागपूर मार्गावरील विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी जनजागृती बाॅईक रॅलीचा हिरवी झेंडी दाखवून मोहीमेचा शुभारंभ केला. यावेळी महावितरणचे विभागीय अधिकारी उदयकुमार फरासखानेवाला उपस्थित होते. महाविकास आघाडी शासनाने सुरू केलेल्या कृषीपंप धोरण 2020 नुसार कृषी पंपधारकांना 31 मार्च 2022 पर्यंत विजबील भरणा केल्यास सप्टेंबर 2020 च्या थकबाकीदारास सरसकट 50 टक्के विजबिल माफ करण्यांत येणार आहे. मूल उपविभागातंर्गत 520 कृषी पंपधारकांनी या योजनेचा फायदा घेवून जवळपास 36 लाखाचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. कृषी पंपधारकांनी या योजनेचा विनाविलंब फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यांत आले आहे. सदर बाईक रॅलीमध्यें मूल उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता चंदन चैरसिया, शाखा अभियंता मनोज रणदिवे यांचेशिवाय अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी शेतकरी मोठया संख्येनी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here