प्लास्टिक विक्रेत्याविरूध्द नगर प्रशासनाची धडक कारवाई

0
105

मूल (प्रतिनिधी)
प्लाॅस्टीक वापराने मानवी जीवनावर होत असलेले विपरीत परिणाम थांबविण्यासाठी शासनाने प्लास्टीक वापरावर बंदी घातली आहे, असे असतांना बाजारपेठेत सर्रासपणे प्लाॅस्टीक पिशव्यांचा वापर होत आहे, व्यावसायीकांना प्लाॅस्टीक पिशव्या न वापरण्याबाबत अनेकदा सुचना व कारवाई केल्या, तरीसुध्दा अनेक व्यापारी प्रशासनाच्या डोळयात धुळ झोकुन प्लाॅस्टीक पिशव्या, डिस्पोजल ग्लास आणि वाटयांची सर्रासपणे विक्री व वापर करीत असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांना मिळाली. मिळालेली माहिती धक्कादायक असल्याने आज दुपारी मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी मास्क वापरा संबंधीची मोहीम राबवितांना स्थानिक गांधी चैकातील व्हेरायटी जनरल स्टोअर्स, नागरेचा पान मटेरियल, करण किराणा स्टोअर्स आणि विश्राम गृह मार्गावरील मयुर जनरल स्टोअर्स येथे तपासणी केली तेव्हा चारही व्यावसायीक प्रतिष्ठांणामधून ४ पोते प्लाॅस्टीक पिशव्या, ४ पोते प्लाॅस्टीक ग्लास, १ पोता प्लाॅस्टीक वाटया, २ पोते प्लाॅस्टीक प्लेट, १ पोता थर्माकोल सिट, १ पोता थर्माकोल प्लेट, १ पोते थर्माकोल बाॅल असा एकुण ७५ हजार रूपये किंम्मतीचा प्लाॅस्टीक वस्तुंचा साठा नगर प्रशासनाने हस्तगत केला. बंदी असतांना अनधिकृतरित्या प्लाॅस्टीक वस्तुंचा वापर व विक्री केल्याच्या कारणावरून नगर प्रशासनाने व्हेरायटी जनरल स्टोअर्स आणि मयुर जनरल स्टोअर्स यांचे विरूध्द दुस-यांदा कारवाई केल्याने प्रत्येकी १० हजार रूपये तर नागरेचा पान मटेरियल आणि करण किराणा स्टोअर्स विरूध्द पहिली कारवाई असल्याने त्यांचे विरूध्द प्रत्येकी ५ हजार रूपये दंड ठोठावला. प्लाॅस्टीक बंदीच्या राबविलेल्या धडक मोहीमेत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांना कार्यालय अधिक्षक तुषार शिंदे, कार्यालय प्रमुख विलास कागदेलवार, अभियंता श्रीकांत समर्थ, विशाल मुळे, सुरज ञिशुलवार आणि आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार यांनी सहकार्य केले. मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी राबविलेल्या प्लाॅस्टीक बंदी मोहीमेचा व्यापा-यांनी चांगलाच धसका घेतला असून अनेकांनी स्वागतही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here