प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून प्रियकरांची फ्रिस्टाईल

0
384

मूल (प्रतिनिधी)
प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून दोन प्रेमविरांमध्यें फ्रिस्टाईल झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी येथील रेल्वे स्टेशनवर घडली. एक फुल दो मालीच्या या कथानकात तीन शिक्षकांनी हस्तक्षेप केल्याने रंगलेली फ्रीस्टाईल थोडक्यात थांबली.
नवीन रेल्वे स्टेशन मागील परिसरात राहणा-या एका शिक्षकाच्या मूलीला घराशेजारी राहणा-या अभयने बुरा न मानो होली है म्हणत अनेकांसमोर तीच्या चेह-याला रंग लावला. अभयने मूलीला रंग लावल्याची धटना पाहणा-या श्रीकांतने सदरचा प्रकार सुहासच्या कानावर घातली. श्रीकांत कडून तीला रंग लावल्याची माहिती होताच सुहास कावराबावरा झाला. कावरा बावरा झालेल्या सुहासने श्रीकांतला संध्याकाळी अभयला रेल्वे स्टेशनवर घेवून येण्यास निरोप दिला. सुहासच्या निरोपाप्रमाणे शेजार मित्र असलेला श्रीकांत अभयला घेवून रेल्वे स्टेशनवर गेला. त्यापुर्वीच रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला सुहास तीन मित्रांसोबत अभयची वाट पाहत बसून होता. अभयाला घेवून श्रीकांत सुहासकडे गेला तेव्हा सुहासने अभयला त्या मूलीला रंग कां लावलास. अशी विचारणा करीत ती माझी प्रेयसी आहे. पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. म्हणत अभयला दमदाटी देवून लागला. दरम्यान अभयनेही मी ज्या मूलीला रंग लावला ती तुझया पेक्षा माझयावर जास्त प्रेम करते, आणि म्हणूनचं आम्ही दोघांनी सगळयांसमोर एकमेकांना रंग लावला. असे बोलून सुहासला तीच्या पासून तूच दूर राहा, अन्यथा तुझे नांव तिच्या आई वडीलांना सांगीतल्या शिवाय राहणार नाही. असे खडे बोल सुनावले. अभयच्या नांव सांगण्याच्या धमकीने राग अनावर झालेल्या सुहासने अभयची काॅलर पकडून त्याच्या कानशिलात लगावली. मित्रांच्या समक्ष सुहासने कानशिलात मारल्याने अभयलाही राग अनावर झाल्याने त्यानेही सुहासची काॅलर पकडून मारायला सुरूवात केली. प्रेमाच्या कारणावरून अभय आणि सुहास मध्यें फ्रिस्टाईल सुरू असतांना मित्रांनी बघ्याची भूमीका घेतली. दरम्यान एक फुल दोन मालीच्या कथानकात अभय आणि सुहासमध्यें रंगलेली फ्रिस्टाईल नियमित फिरून येणा-या तीन शिक्षक मित्रांना दिसली. एकमेकांची काॅलर पकडून उभे असलेले दोघेही युवक सुशिक्षीत कुटूंबातील व वयाची अठरा पुर्ण करणारी दिसल्याने त्या शिक्षकांनी त्यांच्या वादात हस्तक्षेप केला दोघांनाही एकमेकांपासून दूर करून घरी निघा अन्यथा पोलीसांना माहिती देवू. अशी धमकी दिल्याने शेवटी त्या सहाही जणांनी स्टेशनवरून काढता पाय काढला. रंग लावल्याचे कारणावरून निर्माण झालेला एक फुल दो मालीचा वाद शिक्षकांच्या मध्यस्थीने थोडक्यात शमला. हे जरी खरं असलं तरी भविष्यात अश्या अनेक घटना घडत असल्याने पालकांनी सतर्कता बाळगणे तेवढेच गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here