वाघाच्या हल्यात महीला ठार, मोहफुल वेचणा-यांमध्ये दहशत

0
52

मूल : (प्रतिनिधी)
मूल-चंद्रपूर मार्गावरील तालुक्यातील आगडी येथील एक महीला गांवालगतच्या जंगलात मोह वेचण्यास गेली असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने तीचेवर हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आगडी येथील कल्पना नामदेव वाढई वय ५४ असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या सर्वत्र मोहफुल आलेले आहेत. ग्रामिण भागात मजुरी नसल्यामुळे ग्रामिण भागातील लोक मोहफुल वेचुन त्याच्यावर आपले उदर निर्वाह करतात. अस्यातच आगडी येथील कल्पना नामदेव वाढई वय 54 आणि तीची आई कौशल्या मांदाळे आज गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात दोघेही मोहफुल वेचायला गेले. मोहफुल खुप उशिरा पर्यंत पडत असल्याने आई कल्पना वाढई हिची आई कौशल्या मांदाळे ही मातारी असुन ती जेवन करायला घरी आली. अश्यातच कल्पना मात्र उशीर झाला तरी आली घरी परत आली नसल्याने नातू उमेश वाढई याला सांगीतले. तेव्हा उमेश जंगलात जाऊन कल्पनाचा शोध घेतला मात्र ती दिसली नाही. त्यानंतर तो गावामध्ये येऊन गवक-याना घेऊन गेले असता कक्ष क्रमांक ११५ मध्ये कल्पना ही मृत अवस्थेत आढळुन आली .
अंगावरील घावामुळे कल्पनाला वाघानेच मारले याची खाञी झाल्यानंतर सदर माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. येथील वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनपरीक्षेञाधिकारी राजुरकर, सौ. चौधरी, चिरोली पोलीस चौकीचे पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे व गावकरी यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here