मूल तालुका शिवसेने तर्फे शिवजयंती साजरी !

0
27

मूल–
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती तिथी प्रमाणे आज मुल येथील तालुका शिवसेना कार्यालयात साजरी करण्यात आली.
मुल शहर व तालुक्यातील समस्त जनतेला तसेच शिवसेना , युवासेना , महिला आघाडी पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देवून प्रतिमेची पुजा शिवसेना तालुकाप्रमुख नितीन दि.येरोजवार यांनी केली तसेच त्यांनी छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची महती आपल्या विचारातून प्रगट केली .

       या कार्यक्रमाच्या औचित्य साधुन मूल येथील यशस्वी उद्योजक हीरेन शहा,
मुल येथील प्रथम चार्टर्ड अकाऊंट सावन बुटे , प्रथम बालरोग तज्ज्ञ डाॅ.उज्ज्वल बोकारे तसेच हीरो होंडा विक्रीचा उच्चांक गाठणारे दिनेश पडगेलवार यांचे शाल व श्रीफळ देऊन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा आवडते मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देऊन नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी फेस मास्कचे वितरण करण्यात आले.
मुल तालुका शिवसेना विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मुल शहर प्रमुख राहुल महाजनवार,तालुका संघटक सुनिल काळे,तालुका कार्यालय प्रमुख आशिष गुंडोजवार,शहर समन्वयक अरविंद करपे,उपतालुका प्रमुख रवी शेरकी,कपिल येलगेलवार, मधुकर पवार,युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे, युवासेना शहर प्रमुख निखिल भोयर,युवा सेना उपशहर प्रमुख शिनु कन्नुरवार, तालुका समन्वयक अनिल सोनुले ,विनोद काळबांधे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here