राजकिय विरोध विसरून सुधीरभाऊनी दिला मदतीचा हात

0
80

मूल (प्रतिनिधी)
जनतेची सेवा आणि क्षेत्राचा विकास या ध्येयाने प्रेरीत होवुन राजकारण करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवुन समस्येच्या पुर्ततेसाठी धावुन आल्याची प्रचिती चांदापुर वासियांनी अलीकडेच अनुभवली. तालुक्यातील चांदापुर ग्राम पंचायतीच्या हद्दीमधुन जाणाऱ्या मूल-चामोर्शी-खेडी-गोंडपिपरी हा चौरस्ता नेहमी प्रवाश्यांनी गजबजलेला. याठिकाणी दिवसेंदिवस प्रवाश्यांची गर्दी वाढत असल्याने अनेकांनी याठिकाणी खाण्याच्या वस्तु विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रोजगार करणाऱ्यांना दररोज घरून पाणी आणावे लागायचे. त्यामुळे याठिकाणी रोजगार करणारे पाण्याचा वापर ग्राहकांसाठीच काटकसरीने करीत असतात. गरजवंताला पाण्याची बाटल विकत घेवुनच याठिकाणी तहान भागवावी लागते. परंतु पाण्यासाठी पैसे खर्च करण्याची ज्यांची लायकी नसेल त्या गरीबांना माञ मार्गाच्या बाजुने गेलेल्या मोठ्या पाईप लाईनच्या व्हाँल मधुन गळत असलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते. चांदापुर हद्दीतील या चौरस्त्याशिवाय चांदापुर ग्राम पंचायतीच्या स्मशानभुमी मध्येही पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. अंत्यसंस्कारा करीता आवश्यक असलेली क्रिया पुर्ण करण्यासाठी स्मशानभुमीत पाण्याची टंचाई असल्याने नागरीकांना घरून पाणी न्यावे लागायचे. अंत्यसंस्काराकरीता या ठिकाणी पाणी घरून न्यावे लागते तर अंत्यसंस्काराला गेलेल्या नागरीकांना पिण्यासाठी पाणी कसे उपलब्ध होणार ? अशी भयावाह स्थिती येथील स्मशानभुमीची होती. चांदापुर ग्राम पंचायत हद्दीतील या दोन्हीही ठिकाणी जाणवणारी पाण्याची समस्या सुटल्या जावी म्हणुन अनेकांनी विविध ठिकाणी पाठपुरावा केला. परंतु समस्यांची पुर्तता होत नव्हती. क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कडेही प्रयत्न झाले परंतु स्थानिक राजकारणामुळे सदर समस्या सुधीर मुनगंटीवार यांचे पर्यंत कधी पोहोचतचं नव्हती. अलीकडेच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत चांदापुर ग्राम पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वात असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील समस्यांची पुर्तता करण्यास क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार सहकार्य करतील. असे अनेकांना वाटत नव्हते. तरीसुध्दा ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी सदर दोन्ही समस्यांबाबत सुधीर मुनगंटीवार यांचेशी पञव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटुन समस्येची भिषणता लक्षात आणुन देत चौरस्ता आणि स्मशानभुमीत स्थानिक विकास निधी मधुन बोअरवेल मंजुर करावे. अशी विनंती केली. उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी सांगितलेली समस्या भिषण असल्याने त्याच्या पुर्ततेसाठी क्षेञाचा लोकप्रतिनिधी म्हणुन सहकार्य केलचं पाहीजे. असे ठरवुन चंद्रपूर येथील विश्वासु कार्यकर्त्यांमार्फत समस्येची वास्तविकता जाणुन घेतली. समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चांदापुर हद्दीतील चौरस्ता आणि स्मशानभुमी मध्ये अश्या दोन बोअरवेल खोदण्यासाठी स्थानिक विकास निधी मधुन तातडीने निधी मंजुर करून दिला. निवडणुकपुर्व दिलेले जनतेची सेवा आणि क्षेञाच्या विकासात राजकारण आड येवु न देता सुधीर मुनगंटीवार यांनी दुसऱ्याच दिवशी संबंधीत विभागामार्फत मशीन पाठवुन बोअरवेलही खोदुन दिली.ग्राम पंचायतीच्या मागणीची दखल घेवुन क्षेञाचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेवुन बोअरवेल उपलब्ध करून दिल्याने चांदापूर ग्राम पंचायत सरपंच सोनी देशमुख, उपसरपंच अशोक मार्गनवार, सदस्य ब्रम्हानंद मडावी, वंदना कोरेवार, प्रफुल्ल तिवाडे, विनोद कोहपरे, वेणु चिंचोलकर, प्रतिक्षा नागपूरे, सुनीता कडूकार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रती कृतघ्नता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here