लस उपलब्ध होताच पुर्ववत लसीकरण होईल – उपविभागीय अधिकारी खेडकर यांच आश्वासन

0
86

लस उपलब्ध होताच लसीकरण पुर्ववत सुरू होईल – उपविभागीय अधिकारी यांचे आश्वासन
मूल (प्रतिनिधी)
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाचा आजपर्यत ६८३८ नागरीकांनी लाभ घेतला आहे. लसींच्या तुटवळ्यामूळे तालुक्यातील लसीकरण सध्यास्थितीत बंद करण्यात आले असुन लस उपलब्ध होताच लसीकरण पुर्ववत करण्यात येईल. अशी माहीती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.
जनतेची मागणी व अडचण लक्षात घेवुन प्रशासनाने मूल तालुक्यात पाच कोरोना लसीकरण केद्र सुरू केले आहे. मूल तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या पाच पैकी उपजिल्हा रूग्णालय मूल, प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा, चिरोली, राजोली आणि बेंबाळ या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३५४५, मारोडा ११८२, चिरोली ११३५, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या राजोली येथे ४८२ आणि बेंबाळ येथे ४९४ असे एकुण ६७९८ जणांनी लसीकरण केले आहे. सध्यास्थितीत मूल तालुक्यातील पाचही केंद्रावर लसींचा तुटवळा निर्माण झाला आहे, सध्यास्थितीत मूल तालुक्यात कोरोना रूग्ण असलेल्या ८१ जणांपैकी ४३ रूग्ण गृह अलगीकरणात तर ३८ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात आजपर्यत ८५६४ व्यक्तींनी आरटीपीसीआर तर ४०६५ जणांनी अँटीजन असे एकुण १२६२९ व्यक्तींनी कोरोना रोगाची तपासणी केली असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली. उपविभागात येत असलेल्या मूल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढु नये यासाठी शासनाच्या आदेशान्वये मूल तालुक्यात तहसिलदार डाँ. रविंद्र होळी, डाँ. उज्वल इंदोरकर, डाँ. सुमेध खोब्रागडे, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचे नेतृत्वात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगतांना महादेव खेडकर यांनी संभाव्य धोका लक्षात घेवुन सर्वच स्तरातील नागरीकांनी शासनाला सहकार्य करावे. अशी विनंती केली आहे,
मूल येथील वार्ड नं. ८ मधील रामलिला सभागृह परीसरात कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आल्याने त्याचा प्रादुर्भाव परीसरात पसरून सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचु नये, हे लक्षात घेवुन नागरीकांच्या हीताच्या दृष्टीने सदर परीसरात प्रशासनाने मायक्रो कन्टेन्टमेंट झोन जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here