मूल तालुक्यात आज सापडले ३७ कोरोनाबाधीत

0
31
  • मूल (प्रतिनिधी)
    झालेल्या तपासणीत आज मूल तालुक्यात एकुण ३७ कोरोना बाधीत सापडले आहे. ३१ जण आरटीपीसीआर तर ६ जण अँटीजन तपासणीत कोरोना बाधीत सापडले आहे. दिवसागणीक कोरोना बाधीतांचा आकडा तालुक्यात वाढत असल्याने नागरीकांनी सजग राहावे. अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मूल तालुक्यात नोंद झालेल्या १५३४ कोरोना बाधीतांपैकी ११५ जण अधिक संसर्गीत असुन त्यापैकी ६६ जण गृह अलगीकरणात तर ४९ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. आज पर्यंत तालुक्यात ८६५४ जणांनी आरटीपीसीआर तर ४१०६ जणांनी अँटीजन असे एकुण १२७६० व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली. आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट ४८ तासाचे आंत तपासणी केलेल्या व्यक्तीच्या भ्रमणध्वनी वर प्रशासनाने पाठवावा. असे निर्देश आहेत. असे असतांना आरटीपीसीआर तपासणी करून आज ६० तासाच्या वर कालावधी लोटुन गेला. तरीसुध्दा अनेकांना तपासणीचा रिपोर्ट मिळालेला नाही, त्यामुळे प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा नागरीकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. तेव्हा संबंधीत विभागाने तपासणी केलेल्या नागरीकांना तपासणी अहवाल विहीत मुदतीत देण्यात यावा. अशी मागणी केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here