सावली तालुक्यात आज कोरोनाचा उद्रेक

0
264

मूल (प्रतिनिधी)
कोरोना संसर्गाच्या तपासणीत आज मूल तालुक्यात ८ आरटीपीसीआर तर ९ असे १७ व्यक्ती तर सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत १३ तर अँटीजन तपासणीत ५६ असे ५९ व्यक्ती कोरोना बाधीत सापडले आहे. दिवसागणीक कोरोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना आज मूल तालुक्यात कमी तर सावली तालुक्यात तिप्पटीने रूग्ण वाढल्याने नागरीकांनी घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मूल तालुक्यात नोंद असलेल्या १०८ कोरोना बाधीतांपैकी ६६ जण गृह अलगीकरणात तर ४२ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर सावली तालुक्यात १२५ अँक्टीव्ह रूग्णपैकी ३३ जण गृह विलगीकरणात तर ९२ जण संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सावली तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा आज झपाट्याने वाढला असुन तालुक्यातील सातही लसीकरण केंद्रावर आज लस संपल्याने तालुका प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली. मूल तालुक्यात आज ८९ जणांनी आरटीपीसीआर तर ५४ जणांनी अँटीजन आणि सावली तालुक्यात २० जणांनी आरटीपीसीआर तर २०५ जणांनी अँटीजन असे एकुण २२५ व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे मार्गदर्शनात मूलचे तहसिलदार डाँ. रविंद्र होळी आणि सावली येथे तहसिलदार परिक्षित पाटील परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. नागरीकांनी स्वतः सोबत कुटूंबाच्या रक्षणार्थ घरी राहुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here