लाँकडाऊन च्या विकेंड मध्ये किराना दुकाने बंद…….. रेस्टारंट मात्र सुरु…..

0
65

मूल…

–कोरोना चे रुग्ण सतत वाढत असल्याने सरकारने ब्रेक द चैन मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री 8 वाजेपासुन विकेन्ड लॉकडाउन लागु केला. शनिवारी किराना , रेस्टारंट,  बेकरी , औषधी ची आदी दुकाने सुरु होती. दुकानात फार मोठी गर्दी बघावयास मीळाली. रविवारी  किराना व्यावसायीकांनी आपली दुकाने  बंद ठेवली होती , मात्र शहरातील रेस्टारंट रविवारी सुध्दा सुरु असल्याचे दिसुन आले.  शहरात शुकशुकाट दिसुन आला. पोलीसांचा उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यवसाय बंद झाल्यामुळे व्यापारी वर्गांना आर्थीक झळ सोसावी लागते, हे सत्य असले तरी कोणत्याही  प्रकारची दुकाने  सुरु न ठेवता कडक लॉकडाउन असल्यास कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होउ शकेल असे मत अनेक नागरिक व व्यापा—यांनी व्यक्त केले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची 941 संख्या लक्षात घेता कडक  लाँकडाऊन असावे असे मत अनेकांनी व्यक्त केले.  नागरिकांनी आवश्यक काळजी बाळगावी असे आव्हान प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here