मूल तालुक्यात आज सापडले ३८ आणि सावली तालुक्यात ३७ कोरोनाबाधीत

1
195

मूल (संजय पडोळे)
कोरोना संसर्गाच्या तपासणीत आज मूल तालुक्यात २२ आरटीपीसीआर तर १६ असे ३८ व्यक्ती तर सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत १० तर अँटीजन तपासणीत २७ असे ३७ व्यक्ती कोरोना बाधीत सापडले आहे. रूग्ण वाढल्याने नागरीकांनी घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मूल तालुक्यात नोंद असलेल्या १३४ कोरोना बाधीतांपैकी ७८ जण गृह अलगीकरणात तर ५६ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर सावली तालुक्यात १६२ अँक्टीव्ह रूग्णपैकी ५७ जण गृह विलगीकरणात आणि १०५ जण संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रविवार सुट्टीचा दिवस असतांना आज मूल तालुक्यात ४३ आरटीपीसीआर तर २८ जणांनी अँटीजन असे ७१ जणांनी आणि सावली तालुक्यात १२ जणांनी आरटीपीसीआर तर १४३ जणांनी अँटीजन असे एकुण १५५ व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली. मूल तालुक्यात आज पर्यंत १२९७४ आणि सावली तालुक्यात १०२१३ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. दोन्ही तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता लाँक डाऊनची कडक अंमलबजावणी करावी लागेल. असा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे.

1 COMMENT

  1. संजय भाऊ खरोखरच तुमचे पत्रकारीतेचे कार्य प्रशंसनीय आहे. तुमच्या कार्याला माझा सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here