खोदकाम करून रस्ता बंद केल्याने नागरीकांना ञास

0
94

मूल (प्रतिनिधी)
स्थानिक वार्ड नं. १५ मधील सौदागर साँ मील बाजुला असलेला ३५ वर्षापासुनचा वहीवाटीचा मार्ग नारनवरे नामक व्यक्तीनी खोदकाम व झाड तोडुन बंद केल्याने नागरीकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. बंद केलेल्या मार्गाला लागुन सांडपाणी वाहुन नेणारी नाली असुन याच मार्गाखालुन सार्वजनिक नळ योजनेची पाईप लाईन सुध्दा गेलेली आहे. म्हणुन या संदर्भात सदर वार्डातील नागरीकांनी नगर परीषद आणि तहसिल कार्यालय येथे तक्रार नोंदवुन बंद केलेला येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. नागरीकांची अडचण रास्त असल्याने मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी वादग्रस्त जागेवर भेट देवुन पाहणी केली यावेळी नगर परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे आणि वार्डाचे नगर सेवक मिलींद खोब्रागडे उपस्थित होते. परंतु त्यांनी नारनवरे यांनी बंद केलेला येण्या जाण्याचा रस्ता आज पर्यत मोकळा करून दिलेला नाही. वर्दळीचा मार्ग हा मालकीच्या जागेमधुन गेला असुन सदर जागेचा वाद आजपर्यंत न्यायालयात होता. न्यायालयाने सदर जागेचा वाद अलीकडेच निकाली लावला असुन त्यानुसारच सदर जागेचा ताबा घेतल्याचे नारनवरे यांचे म्हणणे आहे. परंतु विहीत कालावधी पर्यत नारनवरे यांनी नगर परीषद कार्यालयात सदर जागेच्या मालकी हक्कासंबंधी दस्तऐवज सादर केले नसल्याचे सांगण्यात आले. ३५ वर्षापासुनचा रहदारीचा मार्ग अचानक खोदकाम व झाड तोडुन बंद केल्याने सदर परीसरात मागील सहा दिवसांपासुन केरकचरा गोळा करणारी घंटा गाडी गेलेली नाही. त्यामुळे परीसरात राहणाऱ्या वीस ते पंचेवीस कुटूंब ञस्त झाले आहेत. परंतु सदर मार्ग मोकळा करून देण्याबाबत नगर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे न्याय मागायचे कोणाकडे ? असा प्रश्न सदर वार्डातील समस्याग्रास्त नागरीकांसमोर निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here