मूल तालुक्यात कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावावे……शिवसेनेची मागणी

0
19

 

मुल तालुक्यात रोज वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे . मागील वर्षी तालुका प्रशासनाने योग्य  नियोजन करुन कोरोना संसर्ग  रोखून दाखविला होता  , मात्र  सध्याची  परिस्थिती अधिक कठीण आहे . या आव्हानात्मक घडीला ब्रेक दि चेन निर्बंधाची अतीशय काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहीजे . यासाठी संपुर्ण मुल तालुक्यात कडक निर्बंध लावल्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन दि.येरोजवार यांनी केली आहे.
मुल तालुक्यात संसर्ग अधिक वाढत आहे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते म्हणुन कडक निर्बंध आवश्यक आहे. मुल शहरात कुठेही संचारबंदी दिसुन येत नाही.अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूच्या दुकानात नियमाची पायमल्ली दिसुन येत आहे कारण मुल शहरात कीराणा दुकानाच्या नावाने माॅल राजरोसपणे सुरू आहे .  मुल शहरातील राईस मिल मध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाही.  कारण परराज्यातील मजुर ये जा करतात परंतु त्याचा रेकॉर्ड वा चाचणी केली जात नाही तसा रेकॉर्ड ठेवला जात नाही त्याप्रमाणेच कोरोना प्रतिबंधात्मक बाबी सोशल डिस्टेंनसीग ,सैनीटायझर, व इतर सुविधा यांच्याकडे उपलब्ध नाही तरी प्रशासनाने लक्ष द्यावे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी सर्व प्रशासनाला आदेश दिले आहे की , नियमाची पायमल्ली जर होत असेल तर अत्यावश्यक सेवा बंद करा .  तालुका स्तरावर तसेच जिल्हास्तरावर बेड व आॅक्सीजन चा तुटवडा आहे जर ब्रेक दि चेन लावायचेअसेल तर संपुर्ण मुल तालुक्यात संचारबंदी कडक अंमलबजावणी लावण्याची गरज आहे. मुल शहरात विवाह समारंभ शासकीय नियमानुसार करणे सुरू आहे परंतु ग्रामीण भागात 400 ते 500 असंख्य लोकांमध्ये विवाह समारंभ सुरू आहे याकडे प्रशासनाने त्वरीत निर्देश देऊन त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक यांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे कारण अनेक वेगवेगळ्या गावातील वर्‍हाडी येऊन कोरोनाचा संसर्ग वाढविण्यात कारणीभूत ठरत आहे जर संपुर्ण तालुक्यात कडक निर्बंध लावला तर कोरोनावर आढा बसु शकतो लवकरच परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा अशी मागणी मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन दि.येरोजवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे याप्रसंगी उपतालुका प्रमुख रवि शेरकी, शहर प्रमुख राहुल महाजनवार,शहर समन्वयक अरविंद करपे, तालुका संघटक सुनिल काळे,महेश चौधरी, युवासेना तालूका प्रमुख संदीप निकुरे,शहर प्रमुख निखिल भोयर ,आशिष गुंडोजवार ,श्रीनिवास कन्नुरवार हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here