सावधान-थाटामाटात लग्न कार्ये केल्यास कारवाई होणार

0
156

मूल (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या वाढती संख्येवर नियंत्रण आणुन नागरीकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करून लग्न विवाह समारंभ साजरा करणाऱ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. १ मे २०२१ च्या सकाळी ७ वा. पर्यंत अंमलात राहणाऱ्या या आदेशान्वये आता केवळ २५ लोंकाच्या उपस्थितीत लग्न विवाह समारंभ साजरा करावा. अन्यथा वर-वधु यांचे शिवाय वर वधुचे आईवडील, सभागृह व कँटर्स चालक यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले असुन ज्या गांवात असे लग्न कार्ये होईल त्या गांवच्या ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांनी त्याबाबतची माहीती लपविल्यास त्यांचे विरूध्दही कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली आहे. त्यामुळे आता थाटामाटात आणि शेकडो आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत लग्न विवाह कार्यक्रम साजरा करणाऱ्या मंडळीना चाप बसला असुन जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे समाजातल्या सर्वच घटकांनी स्वागत केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे तालुक्यातील नागरीकांनी पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार डाँ. रविंद्र होळी आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here