जिल्हा प्रशासनाने जाहीर केला जनता कर्फ्यु

0
284

मूल (प्रतिनिधी)
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवार आणि मंगळवार वगळता बुधवार ते रविवार पर्यंत संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु ची घोषणा केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या जनता कर्फ्युच्या घोषणेचे समाजातील अनेक घटकांनी स्वागत केले असुन नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अशी विनंती केली आहे. आज झालेल्या तातडीच्या आँनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जिल्ह्यातील संपुर्ण वरीष्ठ महसुल, आरोग्य, पंचायत व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जनता कर्फ्युचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील नागरीकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे अनिवार्य असल्याने बुधवार दि. २१/४/२०२१ ते २५/४/२०२१ आणि २८/४/२०२१ ते १/५/२०२१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. जनता कर्फ्युच्या काळात दवाखाने, औषधी दुकाने, कृषी व पशु खाद्य दुकान, शासकीय कार्यालये, बँका, दुध, गँस व वृत्तपञ वितरण, पेट्रोल पंप, हाँटेल
मधील पार्सल सेवा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परवानगी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले आणि जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी संयुक्तपणे जाहीर केले आहे. मूल तालुक्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधीतांचा आकडा ४३ झाला असुन आजपर्यंत ११ जणांच्या मृत्युची नोंद आहे. आरटीपीसीआर तपासणीत ४२ आणि अँटीजन तपासणीत ०१ तर सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत ११ आणि अँटीजन तपासणीत ०३ असे १४ जण बाधीत आढळले आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर ६८ जणांनी आरटीपीसीआर तर २४ जणांनी अँटीजन असे ९२ जणांनी तपासणी केली असुन मूल तालुक्यात आजपर्यंत १४१६० जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या २०२ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १२१ जण गृह अलगीकरणात तर ८१ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. सावली येथे आज आरटीपीसीआर तपासणी झालीच नाही २९ जणांनी अँटीजन तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०७०८ जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १५५ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ६९ जण गृह अलगीकरणात तर ८६ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here